'लोकशाहीत मोर्चे, आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही'

लोकशाहीत मोर्चे तसंच आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार आणि रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी जास्त होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 8, 2017, 04:22 PM IST
'लोकशाहीत मोर्चे, आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही' title=

मुंबई : लोकशाहीत मोर्चे तसंच आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार आणि रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी जास्त होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

मंत्रालयापर्यंत येणाऱ्या मोर्चांमुळे वाहतूक कोंडी होते. मोर्चे आझाद मैदानात थांबवा, अशी मागणी करणारी याचिका चर्चगेट रहिवाशी संघाने केली आहे. आझाद मैदानांपर्यंत येणा-या मोर्चांमुळे वाहतूक कोंडी अधिक होत आहे. दिवसेंदिवस मोर्चांची संख्या वाढतेय. राज्यभरातून येणारे मोर्चे थेट आझाद मैदानात धडकतात. याला निर्बंध घालणे आवश्यक असल्याची मागणी याचिकेवरील सुनावणीवेळी करण्यात आली.

मोर्चांना निर्बंध घालण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलीय. ही समिती या मुद्यावर तोडगा काढणार असल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले आहे. ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.