राज ठाकरेंना अजूनही प्रचाराचा मुहुर्त सापडला नाही

महापालिका निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र अजूनही प्रचाराचा मुहुर्तच सापडू शकलेला नाही. मुंबईत राज ठाकरेंची उद्या पहिली जाहीर सभा घेणार होती. राज ठाकरे पश्चिम उपनगरातल्या चारकोप इथल्या सेक्टर 3 मध्ये पहिली जाहीर सभा घेऊन, मुंबई महानगरपालिका प्रचाराचा नारळ फोडणार होते. पण ही सभा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

Updated: Feb 8, 2017, 03:55 PM IST
राज ठाकरेंना अजूनही प्रचाराचा मुहुर्त सापडला नाही title=

मुंबई : महापालिका निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र अजूनही प्रचाराचा मुहुर्तच सापडू शकलेला नाही. मुंबईत राज ठाकरेंची उद्या पहिली जाहीर सभा घेणार होती. राज ठाकरे पश्चिम उपनगरातल्या चारकोप इथल्या सेक्टर 3 मध्ये पहिली जाहीर सभा घेऊन, मुंबई महानगरपालिका प्रचाराचा नारळ फोडणार होते. पण ही सभा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी उद्या म्हणजेच नऊ तारखेला प्रचाराला सुरूवात करण्याचंही कारण तसं विशेषच होतं. राज ठाकरेंच्या मते 9 हा त्यांच्यासाठी शुभ अंक आहे. त्यामुळेच 9 तारखेला प्रचाराची मूहर्तमेढ रोवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ही पहिली प्रचारसभाही पुढे ढकलण्यात आली आहे.