विस्तार झाल्यावर मंत्री म्हणणार कोणी 'दालन देता का दालन...'

राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार लवकरच होत आहे. त्यानंतर मंत्रालयात आणखी 12 मंत्री लवकरच पदभार स्वीकारून त्यांचा कारभार सुरु करणार आहेत. मात्र यापैकी फक्त 4 ते 5 मंत्री मंत्रालयात सामावले जातील अशी शक्यता आहे. कारण तेवढीच दालनं सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे 7 ते 8 मंत्र्यांना मंत्रालयाबाहेर विधीमंडळातल्या दालनातून कारभार हाकावा लागणार आहे. 

Updated: Nov 20, 2015, 11:32 PM IST
विस्तार झाल्यावर मंत्री म्हणणार कोणी 'दालन देता का दालन...'  title=

मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार लवकरच होत आहे. त्यानंतर मंत्रालयात आणखी 12 मंत्री लवकरच पदभार स्वीकारून त्यांचा कारभार सुरु करणार आहेत. मात्र यापैकी फक्त 4 ते 5 मंत्री मंत्रालयात सामावले जातील अशी शक्यता आहे. कारण तेवढीच दालनं सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे 7 ते 8 मंत्र्यांना मंत्रालयाबाहेर विधीमंडळातल्या दालनातून कारभार हाकावा लागणार आहे. 

नूतनीकरण झालेल्या मंत्रालयात एका बाजूला मंत्री आणि एका बाजूला सचिव अशी दालनं आहेत. या दोन दालनांमध्ये असलेल्या जागेत विविध विभागांची दालनं अशी रचना आहे. यामुळे नूतनीकरण केलेल्या मंत्रालयात नव्या मंत्र्यांसाठी जागाच नसल्याचं चित्र आहे. 

तर विस्तारित मंत्रालयातही बहुतेक सर्व दालनं भरली आहेत. यामध्ये काही जागांची अदलाबदल करत 4 ते 5 मंत्री आणि त्यांची कार्यालयं सामावली जातील अशी स्थिती आहे. त्यामुळे उर्वरित 7 ते 8 मंत्र्यांना मंत्री झाले तरी मंत्रालयातून कारभार करता येणार नाही. त्यांना विधीमंडळमधून कारभार करावा लागणार असल्याचं चित्र आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.