पतंगाने घेतला चिमुरड्याचा जीव

काळबादेवी येथील अमित कळवणकर या शाळकरी मुलाचा पतंग उडवताना अचानक तोल गेल्याने टेरेसवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रामवाडी येथील कपोल निवास येथे राहणाऱ्या अमित हा दुपारी दीडच्या सुमारास टेरेसवरून खाली पडला त्यानंतर तत्काळ त्याला जी. टी रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं.  पण त्यापूर्वीच डॉक्टरांनी अमितला मृत घोषित केलं. 

Updated: Nov 29, 2015, 10:17 PM IST
पतंगाने घेतला चिमुरड्याचा जीव title=

मुंबई : काळबादेवी येथील अमित कळवणकर या शाळकरी मुलाचा पतंग उडवताना अचानक तोल गेल्याने टेरेसवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रामवाडी येथील कपोल निवास येथे राहणाऱ्या अमित हा दुपारी दीडच्या सुमारास टेरेसवरून खाली पडला त्यानंतर तत्काळ त्याला जी. टी रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं.  पण त्यापूर्वीच डॉक्टरांनी अमितला मृत घोषित केलं. 

 इमारतीच्या टेरेसवर अतिशय छोटी संरक्षण भिंत असल्याने अमित खाली पडला असं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळे इमारतीच्या मालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.