`विक्रांत`ला वाचवण्यासाठी बीएमसी सरसावली!

देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 10, 2013, 01:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.
भारतीय नौदलाच्या शौर्याचं प्रतिक असलेली ‘विक्रांत’ ही युद्धनौका तब्बल ३६ वर्षांच्या सेवेनंतर १९९७ साली निवृत्त झाली. त्यानंतर तिचं संग्रहालयात रुपांतर करण्यात आलं. मात्र या संग्रहालयाच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यानं विक्रांतला भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
आता मुंबई महापालिकेनं विक्रांत वाचवण्यासाठी पुढाकार घेतलेला असताना राज्य सरकार या प्रयत्नांना साथ देणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ