अनधिकृत बांधकामावर हातोडा, कृपांच्या मुलाचाही फ्लॅट तोडला

महापालिकेच्या एच पूर्व विभागीय कार्यालयाने आज सीएसटी रोड कलिना येथील अवधूत इमारतीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 12, 2017, 10:15 PM IST
अनधिकृत बांधकामावर हातोडा, कृपांच्या मुलाचाही फ्लॅट तोडला title=

मुंबई : महापालिकेच्या एच पूर्व विभागीय कार्यालयाने आज सीएसटी रोड कलिना येथील अवधूत इमारतीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. वॉर्ड ऑफिसर प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

12 मजल्याच्या या इमारतीचे 7 मजले अधिकृत असल्याची माहिती प्रशांत गायकवाड यांनी दिली, मात्र थेट कॅमेरावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच कारवाई करण्यात आलेल्या 11 आणि 12 व्या मजल्यावर माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या मुलाचा निवास होता. 

या मजल्यांवर तुलनेने सौम्य कारवाई केल्याचा आरोप इमारतीतील रहिवाशी विवेक महाजन यांनी केला आहे. महाजन यांचे आठव्या मजल्यावर घर आहे. त्यांच्या घरावरही कारवाई करण्यात आली आहे. मात्र बिल्डरकडून फसवणूक झाल्याची प्रतिक्रिया महाजन यांनी व्यक्त केली.