भाजपचे आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, ४० कोटीं भूखंड बिल्डरच्या घशात

राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शेलार काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

Updated: Jan 12, 2017, 07:46 PM IST
भाजपचे आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, ४० कोटीं भूखंड बिल्डरच्या घशात  title=

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शेलार काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेतील सुधार समितीच्या माध्यमातून भाजपने मुंबईत कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. आशिष शेलारांनी ४० कोटी रुपये घेऊन वांद्रे हिल रोड येथील एक भूखंड बिल्डरच्या घशात घातला, असा सनसनाटी आरोप मलिक यांनी केला आहे.  

नवाब मलिक यांचे गंभीर आरोप

- भूखंडावरील आरक्षण सुधार समितीत बदलण्यात आले
- यासाठी आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली
- असे अनेक घोटाळे भाजपाने सुधार समितीच्या माध्यमातून केले आहेत
- पुढील आठवड्यात आम्ही आणखी घोटाळे समोर आणणार आहोत
- खेळासाठी आरक्षित भूखंडावर ब्युयो प्राईड इमारतीचे बांधकाम
- पैसे घेऊन आशिष शेलार यांनी आरक्षण उठवले