मुंबईच्या महापौरपदी सेनेचे महाडेश्वर विराजमान

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर भरघोस मतांनी निवडून आले आहेत.

Updated: Mar 8, 2017, 01:30 PM IST
मुंबईच्या महापौरपदी सेनेचे महाडेश्वर विराजमान title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर भरघोस मतांनी निवडून आले आहेत.

शिवसेनेच्या उमेदवाराचा भाजपच्या 82 नगरसेवकांसह त्यांच्यासोबत असलेल्या एका अपक्षानंही पाठिंबा दिला. त्यामुळं शिवसेनेचे बहुमत थेट 171 पर्यंत पोहचला. 

मनसेचे नगरसेवक गैरहजर 
आता तर आधी भाजपसोबत असलेल्या अपक्ष नगसेविका मुमताज खान यांनी मात्र सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यांसाठी मतदानाच्या वेळी हात केला नाही तर मनसेचे सातही नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिले आहेत.

महापौरपदाच्या निवडीसाठी शिवसेनेचे अनेक शिलेदार मुंबई महापालिकेत हजर होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंचा, ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक हे महापालिकेत आवर्जुन हजर होते.