फूड पारखींनी ही पावभाजी एकदा तरी खाल्ली असेल...

भरपूर बटर एवढंच तुम्हाला या पावभाजीत दिसत असलं तरी या पावभाजीत बरंच काही आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 30, 2017, 11:06 AM IST

मुंबई : मुंबईत ताडदेवची सरदार पावभाजी प्रसिद्ध आहे. भरपूर बटर एवढंच तुम्हाला या पावभाजीत दिसत असलं तरी या पावभाजीत बरंच काही आहे. मसाले टाकलेले असले, तरी कृत्रिम रंग नाही, पावही भरपूर बटरमध्ये भिजवलेले असतात. ही पावभाजी शंभर टक्के व्हेज आहे.

कोळशाच्या शेगडीवरच ही पावभाजी बनवली जाते. मागील ५० वर्षापासून आपली ही लोकप्रिय चव सरदार पावभाजीने टिकवून ठेवली आहे.

म्हणूनच ही पावभाजी खाण्यासाठी लोकांची रांग लागते, चांगल्या प्रतिचं बटर या पावभाजीसाठी वापरलं जातं. मुंबईत ही पावभाजी सर्वात लोकप्रिय आहे. तुम्ही मुंबईकर असले तरी ही पावभाजी एकदा तरी खावून पाहा, आणि तुम्ही मुंबईत नसले आणि मुंबईत कधीही आले तर ही पावभाजी नक्की खा.