मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागला, डबल भाडेवाढ

मुंबईकरांवर पुन्हा एकदा बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. बेस्टच्या भाड्यात २ रूपयांनी वाढ होणार असून, दोन टप्प्यांमध्ये ही बेस्टची भाडेवाढ लागू होणार आहे. 

Updated: Jan 13, 2015, 11:44 PM IST
मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागला, डबल भाडेवाढ title=

मुंबई: मुंबईकरांवर पुन्हा एकदा बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. बेस्टच्या भाड्यात २ रूपयांनी वाढ होणार असून, दोन टप्प्यांमध्ये ही बेस्टची भाडेवाढ लागू होणार आहे. 

१ फेब्रुवारी आणि १ एप्रिल अशा दोन टप्प्यांत भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई महापालिका सभागृहात मंगळवारी बेस्टच्या ७ हजार १८५ कोटी रूपयांच्या बजेटला मंजुरी देण्यात आली. बेस्टच्या बजेटमध्येच ही भाडेवाढ सुचवण्यात आली आहे.

त्याशिवाय मासिक पासाच्या दरातही वाढ होणार असल्यानं मुंबईकरांचा खिसा आणखी हलका होणार आहे. विद्यार्थी, अंध, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पास दरातही वाढ होणार आहे. बेस्ट उपक्रम सध्या ४ हजार कोटी रूपयांच्या तोट्यात आहे. तसंच वाढता खर्च भागवण्यासाठी ही भाडेवाढ मुंबईकरांच्या माथी मारण्यात आलीय.

 

किमी  सध्याचे भाडे  १ फेब्रु २०१५  १ एप्रिल २०१५
१० १०
१० १३ १४
१०  १२ १६ १८
१४ १५ २० २२

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.