मुंबई : उडते दिवे लावण्याची हौस दिवाळीत अनेकांना असते, कारण हे दिवे लावल्यानंतर जेव्हा उंचच उंच जातात, तेव्हा ते दृश्य मनमोहक असतं. मात्र दिवाळीच्या काळात असे दिवे उडवण्यावर बंदी लावण्यात यावी, असं अग्निशन दलाने पत्र लिहून मुंबई पोलिसांना सांगितलं होतं.
उडत्या दिव्यांमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये अशा वाढत्या दिव्यांमुळे वाढ होवू शकते, अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून, दिवाळीत पेटत्या दिव्यांच्या कंदीलांना बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत पेटते कंदील उडवता येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
तसेच अशा प्रकारच्या कंदील विक्री करणाऱ्यांवर, उडविणाऱ्यांवर आणि विक्रीसाठा करण्याऱ्यांवर गुन्हे दाखल होवू शकतात.