बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने बनवाबनवी, 'शिवशाही' नाही ती 'शिवनेरी'

मोठा गाजावाजा करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला उद्घाटन केलेली 'शिवशाही' बस खरंतर जुनी 'शिवनेरी'च असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Updated: Jan 23, 2016, 06:42 PM IST
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने बनवाबनवी,  'शिवशाही' नाही ती 'शिवनेरी' title=

मुंबई : मोठा गाजावाजा करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला उद्घाटन केलेली 'शिवशाही' बस खरंतर जुनी 'शिवनेरी'च असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

परिवहन विभागाने केलेली ही फसवाफसवी आम्ही तुमच्यासमोर आणतोय. 'झी मीडिया' ही मोठी बनवाबनवी उजेडात आणली. मुंबई सेंट्रलच्या भरगच्च कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी मोठ्या दिमाखात 'शिवशाही'  बसचे लाँचिंग केले. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर काही वेळातच या 'शिवशाही'  बसवरचे स्टिकर एसटी कर्मचाऱ्यांनी काढण्यास सुरूवात केली आणि महामंडळाने केलेला बनाव लक्षात येवू लागला.

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने बनवाबनवी,  'शिवशाही' नाही ती 'शिवनेरी'

'शिवनेरी' बसलाच बाहेरून स्टिकर्स लावून 'शिवशाही' बस म्हणून पुढे केलं गेलं होतं. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. यावरून इतिहासातील एक संदर्भ लक्षात येतो. घोडी बदलल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवायचं नाही, असा काही आदेश इथंही होता काय, हे कळायला मार्ग नाही, अशी चर्चा रंगतेय.