मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उद्या (मंगळवारी) अधिकृत घोषणा होणार का? याबाबत उत्सुकता आहे.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं मुंबईतील काही जागा निश्चित करून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सोपवला आहे. त्यात शिवाजी पार्क इथल्या महापौर निवासाच्या जागेचाही समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या जागेवर शिवसेनाप्रमुखांचं स्मारक उभारण्यासाठी अनुकूल असल्याचं समजतं.
अधिक वाचा - मातोश्रीत चाकू हल्ल्यात २ जण जखमी
उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा तिसरा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्तानं शिवाजी पार्कमध्ये उभारलेल्या स्मृती स्थळावर मुख्यमंत्री आदरांजली वाहण्यासाठी येतील, अशी शक्यता आहे. त्यावेळी ते शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासंबंधी घोषणा करतील का? याबाबत उत्सुकता आहे.
अधिक वाचा - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात
मात्र, ही घोषणा करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणं अपेक्षित आहे. मुख्यमंत्री आज रात्री उशिरा लंडनहून परतणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.