बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याजवळील जागा निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब यांच्या स्मारकासाठी नेमलेल्या समितीने शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याजवळची जागा निश्चित केली आहे. या समितीचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे सादर करण्यात आला. याबाबत मुख्य सचिवांनी दुजोरा दिलाय.

Updated: Jun 6, 2015, 09:41 AM IST
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित? title=

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याजवळील जागा निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब यांच्या स्मारकासाठी नेमलेल्या समितीने शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याजवळची जागा निश्चित केली आहे. या समितीचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे सादर करण्यात आला. याबाबत मुख्य सचिवांनी दुजोरा दिलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब यांच्या स्मारकासाठी जागा सरकार उपलब्ध करुन देईल, असे स्पष्ट केले होते. तशी त्यांनी घोषणा केली होती. त्यानंतर स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने जागा निश्चित केली आहे. या समितीने शुक्रवारी बंद लिफाफ्यात आपला अहवाल मुख्य सचिव यांना सादर केलाय. आता मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत.

दरम्यान, बाळासाहेब यांच्या स्मारकाच्या जागेचा निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु स्मारकासाठी शिवाजी पार्कजवळील जागा द्यावी, असे आम्ही सूचविले आहे. पण याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती मुख्य सचिव यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कुठे व्हावे, यासाठी जागेचा शोध सुरू असला तरी महापौर निवासस्थानाजवळील पार्क क्लबला शिवसेनेची पहिली पसंती आहे. पार्क क्लबची जागा मुंबई महापालिकेची असून, त्यांचा भाडेकरार संपुष्टात आल्याने हा वाद सध्या न्यायप्रविष्ठ आहे. 

मात्र महापालिकेची सत्ता हाती असूनही शिवसेनेच्या नेत्यांना या प्रकरणी काहीच करता न आल्यामुळे या पार्क क्लबवाल्यांना बाहेर काढून ती जागा स्मारकासाठी मोकळी करून घेण्यासाठीच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.