कोल्हापूर गोळीबार : पानसरे हल्ल्याचा छडा लावू - मुख्यमंत्री

कोल्हापुरात कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्याचा मी निषेध करतो. या हल्याच्या तपासाचे आदेश आपण स्वत: दिलेत.  

Updated: Feb 16, 2015, 12:47 PM IST
कोल्हापूर गोळीबार : पानसरे हल्ल्याचा छडा लावू - मुख्यमंत्री title=
छाया - डीएनए

मुंबई : कोल्हापुरात कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्याचा मी निषेध करतो. या हल्याच्या तपासाचे आदेश आपण स्वत: दिलेत. असे हल्ले होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. हा हल्ला का झाला याचा तपास करण्यात येणार आहे. हल्लेखारोंना पकडण्याचे पोलीस अधिक्षकांना सांगितलेय, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी दिली.

पानसरेंच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी दहा पथकं बनवली आहेत. कोल्हापुरात नाकाबंदी सुरु आहे. पानसरेंवरील हल्ला निषेधार्ह असून या प्रकरणाचा पूर्ण छडा लवकरात लवकर लावू , असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेय. हा प्रकार गंभीर आहे. त्यांना तातडीने त्यांना अटक झाली पाहिजे, याकडे आमचे लक्ष आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

कम्युनिष्ट नेते आणि कामगार नेते गोविंद पानसरे यांनी कोल्हापुरातील टोलविरोधात आंदोलन प्रमुख भूमिका बजावलेय. दोन दिवसांपूर्वी लोकशाही मार्गाने मॉर्निग वॉकचे आयोजन केले होते. राजकीय नेत्यांसह हजारो नागरिक या महापदयात्रेत सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले होते. आज त्यांच्या पक्षाची सभा होणार होती. त्यात ते मार्गदर्शन करणार होते. त्याआधीच त्यांचा गोळीबार करुन गेम करण्यात आला. हा हल्ला झाल्याने विविध तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
 
गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर मास्क लावलेल्या दोन अज्ञात व्यक्तींकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. सकाळी त्यांच्या दिशेने हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पानसरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. तेथील नागरिकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात हलविले. त्यांची स्थिती गंभीर आहे. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूरसह राज्यातील राजकीय नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार राजू शेट्टी, कम्युनिष्ठ नेत भालचंद्र कांगो, अनिसच्या मुक्ता दाभोळकर, सामाजिक नेत्या मेधा पाटकर, विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी तीव्र शब्दात या भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.