मालवणी दारूकांड : प्रमुख आरोपीला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मालवणीतल्या दारूकांडाचा प्रमुख आरोपी मन्सूर अली लतीफ शेख ऊर्फ आतीकला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Updated: Jun 24, 2015, 06:54 PM IST
मालवणी दारूकांड : प्रमुख आरोपीला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी title=

मुंबई : मालवणीतल्या दारूकांडाचा प्रमुख आरोपी मन्सूर अली लतीफ शेख ऊर्फ आतीकला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

विषारी दारूमुळे १०२ लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आतिकला रात्री उशिरा विमानानं दिल्लीहून मुंबईला आणण्यात आलंय. मंगळवारी दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आतीकला दिल्लीमध्ये जेरबंद करण्यात आलं. 

त्यानंतर दिल्लीतल्या कडकडडुमा न्यायालयातून मुंबई पोलिसांनी त्याच्यासाठी ट्रान्झिट रिमांड मागून घेतला. रात्री ११च्या सुमारास जेट एअरवेजच्या विमानानं दिल्लीहून मुंबईला आणण्यात आलं. रात्री दीडच्या सुमारास आतीकला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याची चौकशी सुरू करण्यात आली. 

आज मन्सूर अली लतीफ शेखची वैद्यकीय तपासणी करून त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी त्याला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.