'मालमत्ता कर माफीची मागणी आमचीच'

मुंबई महापालिकेतल्या जागावाटपावरून आधीच युतीमध्ये घमासान सुरू आहे.

Updated: Jan 19, 2017, 06:44 PM IST
'मालमत्ता कर माफीची मागणी आमचीच' title=

मुंबई : मुंबई महापालिकेतल्या जागावाटपावरून आधीच युतीमध्ये घमासान सुरू आहे. त्यात आता घोषणांवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू झालंय.

शिवसेना पुन्हा सत्तेत आली तर मुंबईतल्या 500 चौरस फुटांच्या घरांवर मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे तर 700 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करामध्ये सवलत मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध होण्याआधीच ही घोषणा केली आहे.  

सध्या मुंबईतल्या 30 लाख सदनिकांपैकी जवळपास 15 लाख सदनिका 500 चौरस फुटांपेक्षा लहान आहेत. उद्धव ठाकरेंच्या या घोषणेमुळं मुंबई महापालिकेवर सुमारे 600 कोटींचा अतिरिक्त बोजा पडेल.

निवडणुकीच्या तोंडावर मध्यमवर्गीयांना खूष करण्यासाठी शिवसेनेनं हा रामबाण सोडल्यानं भाजपवाले गडबडून गेलेत. राज्य सरकारकडे मी आमदार म्हणून मागणी केली होती. या सगळ्यानंतर आता काही जणांना उपरती होतेय आणि ते बोलतायेत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय.