www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अंजली दमानिया ‘आम आदमी पार्टी’शी असलेले संबंध तोडलेत. तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा दावा यावेळी अंजली दमानिया यांनी केलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपच्या संस्थापक सदस्यांपैंकी एक असलेल्या अंजली दमानिया यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाठवलाय. दरम्यान, अद्याप पक्षाच्या नेतृत्वाकडून या वृत्ताला अजूनही दुजोरा मिळालेला नाही. ‘आप’चे नेते योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार अंजली या अजूनही पक्षाचा एक भाग आहेत आणि त्या शुक्रवारी होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमालादेखील उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात नागपूर मतदारसंघात भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढविलेल्या अंजली दमानिया स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत. त्यांनी याबाबतीत पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे अनेकदा तक्रारही केली होती.
संबंध तोडण्याबाबतच्या कारणांचा अंजली दमानिया यांच्याकडून खुलासा करण्यात आलेला नाही. दमानिया यांनी संबंध तोडल्यानं `आप`ला हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय. याआधी शाझिया ईल्मी यांनी `आप`ला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर योगेंद्र यादव यांनीही पदांचा राजीनामा दिला होता आणि आता दमानिया... यावरून लोकसभा पराभवानंतर ‘आप’ उतरती कळा लागल्याचंच दिसून येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.