तिने चक्क ११७ किलो वजन कमी केले...

एका अनुवांशिक आजारामुळे ३०० किलो वजनाच्या झालेल्या अमिता रजानी यांनी तब्बल ८ वर्षांनी ११७ किलो वजन कमी केले.मात्र, हे वजन व्यायाम किंवा औषधे घेऊन केले नाही तर त्यांना त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली.

Updated: Jul 11, 2015, 11:05 PM IST
तिने चक्क ११७ किलो वजन कमी केले... title=

मुंबई : एका अनुवांशिक आजारामुळे ३०० किलो वजनाच्या झालेल्या अमिता रजानी यांनी तब्बल ८ वर्षांनी ११७ किलो वजन कमी केले.मात्र, हे वजन व्यायाम किंवा औषधे घेऊन केले नाही तर त्यांना त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली.

२००७ मध्ये त्या अनुवांशिकतेच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांना बेडवरून उठणे सोडच पण हलताही येत नव्हते.त्यामुळे वाढत्या वजनाने त्या चिंतेत होत्या. काय करायचे, या विचारत त्या होत्या. वजन कमी करण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया करण्याच निर्धार केला.
 
एप्रिल महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती आणि त्यांच्या शरिरातील अतिरिक्त चरबी काढून टाकली. यामुळे त्यांचे वजन ३०० किलोवरून १८३ किलोपर्यंत आले आहे. अमिता सारख्या स्थितीसाठी लाइफस्टाइलला दोष देणे चुकीचे ठरेल. त्यांच्या या स्थितीला आनुवांशिक कारणच जबाबदार आहे. मात्र, त्यांनी शस्त्रक्रियेद्वारे त्यावर मात केली.
 
जन्माच्यावेळी अमिता यांचे वजन सामान्य बाळांसारखे होते, पण ६ वर्षानंतर अचानक त्यांच्या वजनात वाढ व्हायला लागली. १०वीत असताना त्यांचे वजन सुमारे १२८ किलो झाले होते. दरम्यान, अमिताच्या आजीचे वजन २५० किलो होते. तसेच अमिताच्या वडिलांनीसुध्दा शस्त्रक्रीया केली होती. 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.