मुंबई : पावसाचा पहिला वीकेंड चिंब झालाय. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात दमदार पाऊस पडत आहे. दिवसभर मध्यम स्वरुपाच्या पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविलाय. दरम्यान, कोणीही समुद्रात जाऊ नये. कारण मोठ्या लाटा उसळणार आहेत, असा इशारा देण्यात आलाय.
आजपासून तीन दिवस मुंबईच्या किनाऱ्यांवर मोठी भरती येणार आहे. ४ मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. समुद्र किनाऱ्याजवळ जाणं टाळण्याचं पालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची खबरदारीची सूचना, शनिवारी, रविवारी आणि सोमवारी असे लागोपाठ तीन दिवस मुंबईच्या समुद्रात ४ मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांनी भरतीच्या वेळी समुद्रात किंवा समुद्राजवळच्या परिसरात जाऊ नये, असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलंय.
मात्र तरीही सुट्टी असल्यानं मुंबईकर लाटा एन्जॉय करण्यासाठी समुद्रावर जातील. पण लाटा एन्जॉय करताना, खबरदारी बाळगायला विसरू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.