मुंबई : पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या ८९व्या साहित्य संमेलनावरील संक्रात कायम आहे. कारण अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणूक प्रकिया भ्रष्ट असल्याचा आरोप होत आहे.
भाजपने श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात मवाळ भूमिका घेतलेली असताना आता काही साहित्यिकांनी मात्र सबनीसांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. संमेलन अध्यक्षांची निवडणूक प्रकिया भ्रष्ट असल्याचा आरोप करत साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
राजन खान, विश्वास पाटील, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, भारत सासणे यांच्यासह अनेक साहित्यिक पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी मुंबईतल्या व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा निवडणूक अधिकारी प्रमोद आडकर यांनी झी 24 तासशी बोलताना केलाय.