मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत आता प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. आज रविवार असल्याचा फायदा घेत उमेदवार सकाळपासूनच प्रचाराला लागले. या प्रचारात आता नेत्यांसह अभिनेतेही उतरले आहेत.
मराठीतला सुपरहिट सिनेमा टाईमपास चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब उर्फ दगडू आणि हिंदी सिने सृष्टितिल अभिनेता विनीत शर्मा यांनी शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 165 चे उमेदवार प्रकाश शुक्ला यांच्यासह प्रचार केला.
मतदारांना दोन्ही अभिनेत्यांनी प्रकाश शुक्ला यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. या अभिनेत्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या आवडत्या कलाकारांसोबत सेल्फी सुद्धा काढले. तर प्रकाश शुक्ला हे आमचे चांगले मित्र असल्याने निवडणूक प्रचार करीत असल्याचे अभिनेत्यांनी सांगितले.