ओम पुरी- अटक आणि सुटका!

पत्नीवरील हल्ल्या प्रकरणी अभिनेता ओम पुरीला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. मात्र लगेचच जमानतीवर त्यांची सुटकाही झाली. वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हरिश्चंद्र परमाले यांनी दिलेल्या माहितीनुसार “ओम पुरी यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर १० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जमानत देण्यात आली.”

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 2, 2013, 12:35 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
पत्नीवरील हल्ल्या प्रकरणी अभिनेता ओम पुरीला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. मात्र लगेचच जामीनावर त्यांची सुटकाही झाली. वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हरिश्चंद्र परमाले यांनी दिलेल्या माहितीनुसार 'ओम पुरी यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर १० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला'
अभिनेते ओम पुरी यांची पत्नी नंदिता हिनं २२ ऑगस्टला ओम पुरी यांनी आपल्याला राहत्या घरात छडीनं मारहाण केल्याची तक्रार नोंदविली होती. ६२ वर्षीय ओम पुरीवर वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या ३२४, ५०४ आणि ५०६ कलमेंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री ओम पुरी परदेशात जाणार होते. आपल्या वर्सोवातल्या फ्लॅटवरुन ओम पुरी आणि त्यांची पत्नी नंदिता यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार नंदिता यांनी पोलीस स्टेशनमध्ये केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.