मुंबई: शिवसेना-भाजपमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून रूसवेफुगवे सुरू असतानाच, भाजपनं आता नवा नारा दिलाय. 'अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र'...
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या 4 सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. त्यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी भाजपनं ही जोरदार पोस्टरबाजी केलीय. यानिमित्तानं सर्व जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार आहे की काय, अशी शंका निर्माण झालीय.
निम्म्या जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढण्याचा इशारा भाजपनं दिलाय. या पार्श्वभूमीवर 'अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र'चा नवा नारा म्हणजे भाजपच्या 'एकला चलो रे'ची नांदी मानली जातेय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.