मुंबईत 'आहार' शेतकऱ्यांच्या मदतीला

बाजारपेठा नियंत्रणमुक्त केल्यामुळे शेतकरी आपला माल मुंबईत घेऊन येत आहेत. शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवता यावा यासाठी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांची सर्वात मोठी संघटना आहार धावून आली आहे.

Updated: Jul 13, 2016, 04:34 PM IST
मुंबईत 'आहार' शेतकऱ्यांच्या मदतीला title=

मुंबई : बाजारपेठा नियंत्रणमुक्त केल्यामुळे शेतकरी आपला माल मुंबईत घेऊन येत आहेत. शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवता यावा यासाठी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांची सर्वात मोठी संघटना आहार धावून आली आहे.

आज आहार संस्थेचीही नाशिकच्या उत्पादकांशी बोलणी सुरु आहेत. उत्पादक माल थेट या संस्थेमार्फत हॉटेल्स पर्यंत पोहचवतील.त्यामुळे आता हा प्रयोग यशस्वी झाला तर व्य़ापाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे. मात्र थेट विक्रीची प्रक्रीया सुरळीत झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय.

मुंबईत ग्राहकांना स्वस्त भाजीपाला मिळावा यासाठी मुंबईत थेट मार्केटिंग कंपनी मार्फत शेतमाल आणण्याची व्यवस्था करण्यात आलीय.  

या केंद्रांवर थेट शेतकरी आपला माल ग्राहकांना विकू शकताय. यामुळं ग्राहक आणि शेतकऱ्यांना लुटणारी साखळी गळून पडणार आहे. फार्मर-प्रोड्युसर्स कंपनीच्या माध्यमातून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.