मुंबई : मुंबईत एक लव गुरू कॉलेजच्या विद्यार्थीनींना खूपच त्रास देत आहे. नाइट कॉलेजमध्ये शिकणारा हा गुरू आपल्या विद्यार्थीनींना I Love You म्हणण्यास सांगत आहे. इतकेच नाही हा आंबट शौकिन गुरू आपल्या विद्यार्थीनींना फोन करून त्यांना अश्लील गप्पा मारण्यास भाग पाडतो. लव गुरूच्या या वागण्याने विद्यार्थीनी खूपच हैराण झाल्या आहे, त्यामुळे त्या आता कॉलेजमध्ये येण्यास घाबरत आहेत.
- हा लव गुरू दिलफेक आशिक आहे.
- आपल्या विद्यार्थीनींना वाईट नजरेने पाहतो.
- विद्यार्थीनींना l Love You म्हणायला लावतो
- लेक्चररच्या आंबटशौकीमुळे विद्यार्थीनी हैराण
मुंबईतील गोरेगाव भागात लॉर्ड्स नाइट कॉलेजच्या विद्यार्थीनी आपल्या दिलफेक आशिक लेक्चररला घाबरून आहेत. अग्रवाल नावाच्या या लेक्चरारच्या अश्लिल वागण्याने त्या इतक्या घाबरलेल्या आहेत की त्यांना कॉलेजमध्ये जाण्याची भीती वाटत आहे. त्यांचे म्हणणे आहे की अग्रवाल सर भरलेल्या क्लासमध्ये अश्लिल बोलतात. तरूणींनी असाही आरोप केला की सर त्यांना I Love You म्हणायला भाग पाडतात.
एका विद्यार्थीनीने झी मीडियाशी बोलताना सांगितले की, सर आमच्याकडून मोबाईल नंबर मागतात, I Love You म्हणायला लावतात. रात्री फोन करतात आणि घाणेरडे एसएमएस पाठवतात.
दुसऱ्या विद्यार्थीनींने सांगितले की, सर धमकी देतात की तुम्हांला परीक्षेत नापास करून टाकेल, माझे म्हणणे ऐका, सर्वांचे मोबाईल नंबरही मागतात.
या रंगरेल लेक्चररच्या वागणूक इतक्यावरच थांबत नाही. तरूणींनुसार सर त्यांना अश्लिल एसएमएस पाठवता. तसेच रात्रीपर्यंत फोन करून अश्लिल गप्पा मारतात. या लेक्चररच्या अशा वागण्याची तक्रार कॉलेज प्रशासनाला केली पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही.
यातील तिसऱ्या विद्यार्थीनीने सांगितले की, परीक्षेवेळी ते सुपरव्हिजनला असल्यावर संपूर्ण चेक करतात. अंडर गारमेंटही दाखविण्यास सांगतात. इनरवर काही लिहून आणलं असेल तर. बाथरूमलाही जायचे असेल तर मला सांग मी संपूर्ण चेक करणार.
या संदर्भात एनएसयूआय स्टुडंट लीडर रवि सिंह याने सांगितले की, पीडित विद्यार्थ्यीनींना न्याय देण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकद लावणार आहोत.
यौन शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या प्रोफेसरने आपण निर्दोश असल्याचे सांगितले पण झी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. विद्यार्थ्यांनी या लव गुरू विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
विद्यार्थीनींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल झी मीडियाने उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी बातचीत केली त्यांनी सांगितले की, लिखित तक्रार आल्यार ते नक्कीच या संदर्भात पाऊलं उचलणार आहे. या संदर्भात कॉलेज प्रशासन अजूनही चिडीचूप आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.