पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २०१५-१६ मध्ये ३१ जुलै रोजी वयाची कमीत कमी ५ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. यापूर्वी ही वयोमर्यादा सहा वर्षे होती.

Updated: Jan 21, 2015, 09:07 PM IST
पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र title=

मुंबई : शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २०१५-१६ मध्ये ३१ जुलै रोजी वयाची कमीत कमी ५ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. यापूर्वी ही वयोमर्यादा सहा वर्षे होती.

​२०१५-१६ साठी ३१ जुलै रोजी प्ले ग्रुप, नर्सरी करीता किमान वयोमर्यादा ३ वर्षापेक्षा अधिक असून इयत्ता पहिली करीता ३१ जुलै रोजी किमान वयोमर्यादा २०१५-१६ साठी ५ वर्ष पूर्ण, २०१६-१७ करीता ५ वर्ष ४ महिने पूर्ण, २०१७-१८ करीता ५ वर्ष ८ महिने पूर्ण, २०१८-१९ करीता ६ वर्ष पूर्ण अशी ठरविण्यात आली असून हा नियम राज्यातील सर्व प्रकारच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.