पाच दिवसात सोनं १ हजार १८० रूपयांनी वधारलं

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८, ५०० रूपयांवर गेला आहे. सोन्यानं पाच महिन्यांतला उच्चांक गाठला आहे, बुधवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २८,५०० रुपये इतका झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम १,१८० रुपये वधारलं आहे.

Updated: Jan 21, 2015, 08:13 PM IST
पाच दिवसात सोनं १ हजार १८० रूपयांनी वधारलं title=

मुंबई : ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८, ५०० रूपयांवर गेला आहे. सोन्यानं पाच महिन्यांतला उच्चांक गाठला आहे, बुधवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २८,५०० रुपये इतका झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम १,१८० रुपये वधारलं आहे.

आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्याचा भाव १०० रूपयांनी वाढला आणि सोनं २८ हजार रूपयांवर गेलं होतं. सोने खरेदीचा जोर मागील आठवड्यापासून कायम आहे.

भारतात लग्न सराईचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात येतेय. दुसरीकडे जागतिक बाजारपेठेत तेजी असल्याने सोने व्यापाऱ्यांनी मोठी खरेदी केली आहे. सोन्याचा भाव २८ हजार500 रूपयांवर गेला आहे. सोन्याचे भाव वधारले असतांना सोन्याची खरेदीचा जोरही वाढतांना दिसतोय.

सोन्यानं पाच महिन्यांतला उच्चांक गाठला असून बुधवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २८,५०० रुपये इतका झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम १,१८० रुपये वधारलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.