मुंबई महापालिकेत ४९ रिक्त पदे भरणार

मुंबई महापालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खाते आणि प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

Updated: Jan 22, 2015, 08:02 AM IST
मुंबई महापालिकेत ४९ रिक्त पदे भरणार title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खाते आणि प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

सर्वसाधारण आरक्षणमधील ३२, महिला ३० टक्केमधून १५, खेळाडू आरक्षण ५ टक्केमधून २ अशी एकूण ४९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

उमेदवारांनी निवड प्रक्रियेसाठी कस्तुरबा रुग्णालय, आर्थर रोड कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (प.) मुंबई -११ येथे ५ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ ते ३.३० वाजता यावेळेत उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.