२६/११ हल्ला : मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?

२६-११ दहशतवादी हल्ल्यानं मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सुमारे ८० तास दहशतवादी मुंबईला वेठीस धरुन होते. हा हल्ला इतका भीषण होता की, मुंबई पोलीसही हतबल झाले होते. दहशतवाद्यांना संपवण्यासाठी एनएसजीला पाचारण करावं लागलं. या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र आज तरी मुंबईनगरी पूर्णपणे सुरक्षित आहे का, हा प्रश्नच आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 27, 2012, 10:38 AM IST

www.24taas.com, मुंबई
२६-११ दहशतवादी हल्ल्यानं मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सुमारे ८० तास दहशतवादी मुंबईला वेठीस धरुन होते. हा हल्ला इतका भीषण होता की, मुंबई पोलीसही हतबल झाले होते. दहशतवाद्यांना संपवण्यासाठी एनएसजीला पाचारण करावं लागलं. या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र आज तरी मुंबईनगरी पूर्णपणे सुरक्षित आहे का, हा प्रश्नच आहे.
२६ नोव्हेंबर २००८ मध्ये तब्बल १० दहशतवादी मुंबईत घुसतात आणि सुरक्षा व्यवस्थेला त्याची खबर सुद्धा नसते. महाराष्ट्र सरकारनं त्यावरुन धडा घेत लंडनच्या धर्तीवर मुंबईच्या कानाकोप-यात नजर ठेवण्यासाठी सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय जाहीर केला. गृहमंत्र्यांनी आपल्या अधिका-यांसोबत लंडन दौराही केला. मात्र ३००कोटींची योजना टेंडर काढण्यापलीकडे पुढे गेली नाही. मुंबई पोलीस सध्या वाहतूक बंदोबस्तासाठी लावण्यात आलेल्या १००कॅमे-यांवर अवलंबून आहे. त्यातही अनेक कॅमेर नादुरुस्त आहे.

दहशतवादी समुद्र मार्गानं आले होते. त्यामुळे मुंबईत दोन सागरी किनारा पोलिस ठाणे स्थापन करण्यात आले. मात्र तेथेही अनेक पदे रिक्त आहेत. गंभीर बाब म्हणजे दोन कोटी किमतीच्या २७बोटी आहेत. त्यातील १४ बोटींची दूरवस्था झाली आहे.

२६-११ हल्ल्यानंतर मुंबईत एनएसजीचं केंद्र बनवण्यात आलं. मात्र ज्या स्थितीत हे केंद्र आहे. आणि त्यांचा सराव आहे. त्यावरुन सुद्धा प्रश्न उपस्थित होतायेत. गरज पडल्यास फोर्स वन आणि क्विक रिस्पॉन्स टीम किती प्रभावी ठरेल हे सांगणंही कठीण आहे. हल्ल्यानंतर बुलेटप्रूफ गाड्या तर मिळाल्या मात्र बॉम्ब डिफ्यूज करणा-या सूटचा दर्जावरही संशय घेतला जातोय. एव्हढ्या त्रृटी असूनही गृहमंत्री म्हणतात सगळं काही ठिक आहे.

२६-११ च्या हल्लानंतर रेल्वे स्टेशन च्या सुरक्षेसाठी २५कोटींची इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम योजना बनवण्यात आली. या योजनेनुसार स्टेशनवर सीसीटीव्ही कँमेरे, एक्सरे, स्कॅनर, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड असणे आवश्यक आहे. मात्र ही योजनासुद्धा पूर्ण होऊ शकली नाही.