मुंबई : हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नका, असं आवाहन वाहतूक पोलीस वारंवार करताना दिसतात... पण याचा काहीच फायदा होताना दिसत नसल्याचंच दिसून येतंय.
जानेवारी २०१६ ते जून २०१६ या सहा महिन्यांच्या काळात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये तब्बल १०२ जणांनी आपले प्राण गमावलेत. यात ७० जण दुचाकी चालवणाऱ्यांचा समावेशत आहे तर मागे बसलेल्या ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय २२३ जण जखमी झाले आहेत.
राज्य सरकारने लागू केलेल्या हेल्मेटसक्तीला सर्वच स्तरांमधून विरोध होत असताना या आकडेवारीवरुन हेल्मेटसक्ती किती गरजेची आहे हे स्पष्ट होतंय.