मेडिकल प्रवेशाचा घोळ आज सुटणार?

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना टांगणीला लावणारा मेडिकलच्या प्रवेशाचा घोळ आज सुटण्याची अपेक्षा आहे.

Updated: Sep 14, 2016, 08:18 AM IST
मेडिकल प्रवेशाचा घोळ आज सुटणार? title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना टांगणीला लावणारा मेडिकलच्या प्रवेशाचा घोळ आज सुटण्याची अपेक्षा आहे.

अभिमत विद्यापीठांचे प्रवेशही ऑनलाईन प्रक्रियेनुसारच व्हायला हवेत, यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका केलीय. यावर उद्या निर्णय अपेक्षित आहे. तर खासगी कॉलेजांमधल्या ८५-१५ फॉर्म्युलाविरोधात संस्थांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय. यावरही आज सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचीही जय्यत तयारी झालीय. सरकारकडे २० हजार अर्ज आलेत. सरकारी तसंच अभिमत आणि खासगी कॉलेजांमधल्या ८५ टक्के जागांची यादी तयार असून आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालांची प्रतिक्षा असल्याचं वैद्यकीय शिक्षण संचालक प्रविण शिनगारे यांनी सांगितलंय.