इक बंगला बने न्यारा!

आर्थिक मंदीमुळं बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसत असल्याचं बोललं जातंय. मात्र असं असलं तरी मध्य आणि दक्षिण मुंबईत आजही असे काही प्रोजेक्ट्स आहेत जे १०० कोटी रुपयांना फ्लॅट विकण्याच्या तयारीत आहेत.यामध्ये ड्युप्लेक्स आणि ट्रिप्लेक्स फ्लॅट्सचा समावेश आहे

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 18, 2013, 04:39 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
आर्थिक मंदीमुळं बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसत असल्याचं बोललं जातंय. मात्र असं असलं तरी मध्य आणि दक्षिण मुंबईत आजही असे काही प्रोजेक्ट्स आहेत जे १०० कोटी रुपयांना फ्लॅट विकण्याच्या तयारीत आहेत.यामध्ये ड्युप्लेक्स आणि ट्रिप्लेक्स फ्लॅट्सचा समावेश आहे
मुंबईच्या वरळी आणि लोअर परळ भागातील काही विकासक हे १०० कोटींच्या घरातील कस्टमाईज्ड लक्झरी अपार्टमेंट बनवून विकत आहेत. स्काई बंगलो म्हणून त्यांची विक्री होतेय.
ओमकार १९७३ वरळी नावाच्या प्रोजेक्टमध्ये १०० कोटींचे फ्लॅट्स तयार होत आहेत. यामध्ये अपार्टमेंटचं साईज हे जवळपास १८ हजार ते २० हजार स्क्वेअर फुटात असणार आहे. ज्यासाठी
४० हजार रुपये स्क्वेअर फूट इतकी किंमत मोजावी लागणार आहे.
त्याचप्रमाणं रहेजा ग्रुप वरळीमध्येच १०० कोटींचं डुप्लेक्स फ्लॅट तयार करीत आहे. १५ हजार ते २० हजार स्क्वेअर फुटांचं ती घरं असणार आहेत. ज्याची किंमत ही ५० हजार रुपये प्रती स्क्वेअर फूट एवढी असेल. लोढा डेव्हलपर्सही आपल्या वर्ल्ड वन प्रोजेक्टमध्ये ५० हजार रुपये प्रती स्क्वेअर फुटानं डुप्लेक्सची विक्री करणार आहे.
विशेष म्हणजे अशा या अपार्टमेंटमध्ये खास सुख-सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येतं. लिफ्टमध्ये प्रेशर कंट्रोल सिस्टीमचा वापर केला जाते. स्पीड लक्षात घेता एक्स्प्रेस लिफ्ट लावण्यात येते. आगीपासून सरंक्षण मिळण्यासाठी खास यंत्रणा तयार केली जातेय. या व्यतिरिक्त सीसीटीव्ही किवा आयडेंटीफाई सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जातेय.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इमारतींमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जांच्या ‘स्पा’ सोबत टाय-अप केलं जातंय. फीटनेस जीमपासून योगा सेंटरचीही सुविधा इथं पुरवली जातेय. इमारतीमध्ये २५०० ते ३००० एवढ्या जागेची पार्किंग दिली जातेय. फ्लॅटमध्ये लावलेलं जापानमधील पियानो आणि विदेशी लाईटींगही ग्राहकांचं खास आकर्षणाचं केंद्र बनतेय.
होम ऑटोमेशन सिस्टममुळं फक्त विजेची बचतच नाही तर तुमच्या आवडीनुसार लाईटचं सेटिंगही केलं जातंय. घरातील मुलांचं बेडरुम आणि बाथरुमही मुलांच्या आवडीनुसारच तयार केले जातायेत. किचनमध्ये मॉड्यूलर कॅबिनेटसोबतच चिमनी आणि गॅस होब्सची सुविधा दिली जातेय. स्टडी रुमपासून ड्राईंगरुम पर्यंत वुडन फ्लोरींग केली जातेय. या व्यतिरिक्त मुलांसाठी खास बास्केट बॉल नेट, बॅडमिंटन लाँज, क्रिकेट प्रॅक्टीस नेट आणि स्क्वॅश कोर्ट तयार केले जात आहेत. एवढंच नाही तर घरातील पाळीव प्राण्यांसाठी खास स्पा आणि पेट पार्कची सोय करण्यात येतेय. घरातच मिनी थिएटर्सही उपलब्ध असणार आहे. यासर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी आंतरराष्ट्रीय बांधकाम पार्टनर्सशी टाय-अप केलं जातंय. एकूणच किमतीप्रमाणं सुख-सुविधांनी उपलब्ध असा असलेले हे फ्लॅट्स असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.