आयकर विभागाकडून १ लाख कोटी रूपयांचा रिफंड

केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल १ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. 

Updated: Feb 9, 2016, 11:50 PM IST
आयकर विभागाकडून १ लाख कोटी रूपयांचा रिफंड title=

नवी दिल्ली : केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल १ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. 

अधिया यांनी म्हटले की, २०१५-१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत १.७५ कोटी करदात्यांना १ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे.

फिल्ड अधिकाऱ्यांना ५ हजार रुपयांपर्यंत रिफंड तात्काळ देण्याचे निर्देश सीबीडीटीने दिले होते. ५ हजारांपेक्षा कमी रकमेच्या कराची थकबाकी असलेल्या प्रकरणांत येणे असलेला कर रिफंडमधून परस्पर कापून न घेता, रिफंड करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. 

करदात्यांना रिफंड लवकरात लवकर मिळावा यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने गेल्या वर्षी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे रिफंड लवकरात लवकर अदा करण्यात यावे, असे त्यांना बजावण्यात आले होते.