www.24taas.com, मुंबई
बनावट बिल देऊन करचुकवणा-यांना चांगलाच चाप बसणारयं. राज्याच्या विक्रीकर विभागानं त्याकरता खास सॉफ्टवेअर तयार केलय. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सेल्स टॅक्सची चोरी करणा-यांवर करडी नजर ठेवण्यासाठी एका आर्थिक विभागाचीही निर्मीतीही करण्यात आली आहे.
राज्याच्या विक्रीकर विभागानं बनावट बिल देऊन केली जाणारी करचोरी रोखण्यासाठी एक नवं सॉफटवेअर तयार केलय. या सॉफ्टवेअरमध्ये पॅननंबर टाकताच एक्साईज आणि कस्टम ड्युटीशी निगडीत सर्व माहिती काही क्षणांत मिळू शकते. आयकर, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सीमाशुल्क विभागाच्या मदतीनं हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलय. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत तब्बल एक हजार कोटी रूपयांची भर पडणार आहे.
या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करचुकव्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र विभागही तयार करण्यात आलाय. या विभागात २७ अधिकारी असणार आहेत. सॉफ्टवेअरमुळे केवळ करबुडव्यांना आळाच बसणार नाही तर नियमित करदात्यांनाही त्याचा फायदा होईल असा विश्वास विक्रीकर विभागानं व्यक्त केला आहे.