सेना - मनसेचा विरोध, रिक्षा संपाला....

शरद राव प्रणित रिक्षा युनियनच्या संपाला शिवसेनाप्रणित रिक्षा युनियननं विरोध केला होता. त्यामुळं १६ एप्रिलला होणाऱ्या रिक्षा चालकांच्या संपात फूट पडली आहे. शरद राव यांच्या मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियननं भाडेवाढीची मागणी करत संप पुकारला आहे.

Updated: Apr 15, 2012, 02:26 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शरद राव प्रणित रिक्षा युनियनच्या संपाला शिवसेनाप्रणित रिक्षा युनियननं विरोध केला होता. त्यामुळं १६ एप्रिलला होणाऱ्या रिक्षा चालकांच्या संपात फूट पडली आहे. शरद राव यांच्या मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियननं भाडेवाढीची मागणी करत संप पुकारला आहे. मुंबई  होणाऱ्या ऑटोरिक्षाच्या या संपाला शिवसेना, मनसे, काँग्रेस यांनी फी

 

सरकारने ऑटोरिक्षाच्या भाड्यात एक रुपया वाढ केली असली तरी राव यांच्या युनियनला पहिल्या टप्प्यासाठी ५ रुपये आणि या पुढच्या टप्प्यासाठी दोन रुपये भाडेवाढ हवी आहे. त्यामुळं मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियननं १६ एप्रिलला बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

 

या संपाला मनसेप्रणित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आणि त्यापाठोपाठ शिवसेनेनं विरोध केला आहे. संपात सहभागी झाल्यास परमिट रद्द करण्याचा इशारा सरकारनं केला आहे. संपात सहभागी न होणाऱ्या रिक्षाचालकांना धमकावणाऱ्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.