www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बिहाराचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर राज यांनी बिहार दिनाला 'ग्रीन सिग्नल' दिला. बिहार दिन हा राजकीय कार्यक्रम नसल्याने तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे आपली काही हरकत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
* नीतिश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे
* राजकीय उद्देश नसेल तर सांस्कृतिक कार्यक्रम करायला माझा विरोध नाही
* बिहार दिनाला राज ठाकरे यांची हरकत नाही
* देवेश ठाकूर यांच्या भेटीत गैरसमज दूर
* बिहार दिनातील अडसर दूर
* गैरसमज निर्माण करायला सुरूवात नीतिश कुमार यांनी केली
* व्हिसाचा मुद्दा मी काढला नाही
* कोणत्याही प्रकारचे राजकीय पोलिटिक स्टेटमेंट येणार नाही, तरच या कार्यक्रमाला परवानगी
* मला बिहारी येत नाही, त्यामुळे मी या कार्यक्रमाला जाणार नाही
* नीतिश कुमार यांच्याशिवाय कोणालाही व्यासपीठावर परवानगी नाही - राज
* बिहार दिनाच्या कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने होणार
* नीतिशकुमार यांचे काम चांगले - राज
* मराठी माणसाला ताकद दाखविल्यास आमचा विरोध
* अबू आझमीसारखे माणसे महाराष्ट्रात ताकद दाखविण्याचे प्रयत्न करीत आहे
* नीतिश कुमार बिहारमध्ये चांगले काम करीत असतील, तर येथील बिहारी माणसांना परत बिहारमध्ये न्या - राज