www.24taas.com,मुंबई
मुंबईत आजपासून दहा टक्के पाणीकपात होणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांत फक्त ५३ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एक जुलैपासून दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत पावसाचं आगमन झालं असलं, तरी मुंबईला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळं मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे.
मुंबईला सध्या दररोज २ हजार ९००दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करावा लागत आहे. गेल्या वर्षी ९ लाख ६२ हजार ४५२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. यंदा तो ७ लाख 38 हजार ३३६ इतका आहे. म्हणजे सुमारे 26 टक्के पाणीसाठा कमी आहे.