www.24taas.com, मुंबई
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवातच आक्रमक झाली आहे. मंत्रालय आगीच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे चर्चेची मागणी केली. मात्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.
त्यामुळे संतप्त विरोधकांनी विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. अखेर विधानसभेचं कामकाज एक तासासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्याची नांदी विधीमंडळ सभागृहाबाहेरही पहायला मिळाली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच शिवसेना, भाजप आणि मनसेनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मंत्रालय आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी निवदेन देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानंतर विरोधकांनी अधिवेशनातही धूमशान घातलं..एकूणच मंत्रालय आगीच्या मुद्यावर विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता विधीमंडळाचं आजचं कामकाज सुरळीत पार पडणं तसं कठिणच दिसतय.