दळवींचा सत्कार करा, शाहरूखने मराठी शिकावं- मनसे

शाहरुखसोबत बाद झालेल्या एमसीएच्या सुरक्षारक्षकाच्या सत्काराची मागणी मनसेच्या प्रवक्त्यानं केली आहे. 'एमसीएच्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करा' 'शाहरुखने मराठी शिकायला हवे' 'मराठी येत नाही म्हणून शिवीगाळ अयोग्य' 'सुरक्षा रक्षक दळवींचा सत्कार करा'

Updated: May 18, 2012, 05:47 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शाहरुखसोबत बाद झालेल्या एमसीएच्या सुरक्षारक्षकाच्या सत्काराची मागणी मनसेच्या प्रवक्त्यानं केली आहे. 'एमसीएच्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करा' 'शाहरुखने मराठी शिकायला हवे' 'मराठी येत नाही म्हणून शिवीगाळ अयोग्य' 'सुरक्षा रक्षक दळवींचा सत्कार करा' अशी मागणी मनसे प्रवक्ते वागीश सारस्वत यांनी मागणी केली आहे. त्यामुळे शाहरूखने माफी मागितली पाहिजे अशी मागणीही मनसेकडून केली जात आहे, यामुळे आता शाहरुखच्या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.

 

याआधी शाहरूखने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मान्यही केले होते की त्याने सुरक्षारक्षक  पी. व्ही दळवी यांना शिवगाळ केली होती. मात्र तो माफी मागणार नाही असा हेकेखोरपणाही दाखवला होता. शाहरूखच्या म्हणण्यानुसार सुरक्षारक्षकांनी त्याला मैदानावर जाण्यास बंदी केली. तेव्हा मात्र शाहरूखने चांगलाच धिंगाणा घातला, दारूच्या नशेत त्याने सुरक्षारक्षक आणि पदाधिकारी यांना शिवीगाळ केली, मात्र त्याबरोबर शाहरूखने असेही म्हटले आहे की, 'सुरक्षारक्षक हा मराठीत  मला काहीतरी बोलत होता.

 

त्यामुळे तो काय  बोलत  होता ते मला समजत नव्हतं आणि म्हणूनच मी शिवीगाळ केली',  त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून मनसे मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे. शाहरूखने मराठीचा अपमान केला आहे. ज्या मुंबईत राहून त्याने आजवर जे कमावलं, त्याच मुंबई आणि मराठीचा त्याने अपमान केला आहे. त्यामुळे त्याला मराठी हे यायलाच पाहिजे अशी मागणी मनसेने केली आहे, वानखेडे मैदानावर दारुच्या नशेत शाहरुखनं धिंगाणा घालत सुरक्षा रक्षकांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप एमसीएनं केला होता.

 

पण, शाहरुखने मात्र स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, सुरक्षा रक्षकांनी माझ्या मुलांना धक्काबुक्की केली, मलाही शिव्या दिल्या. मग मीही शिव्या दिल्या. पण  त्यावेळी मी मद्यप्राशन मात्र केले नव्हते. मी माफी मागणार नाही, त्यांनीच माझी माफी मागावी, असंही त्यानं यावेळी म्हटलं होतं.

 

[jwplayer mediaid="103261"]