ड्रग्स पुरवणारे...पोलिसांना सापडत का नाही?

मुंबईच्या जुहू रेव्ह पार्टीत ड्रग्स पुरवणारा ड्रग्स माफिया चार दिवसांनंतरही पोलिसांचा हाती लागलेला नाही आहे. रेव्ह पार्टीसाठी लाखो रुपयांचे ड्रग्स ह्या ड्रग्स पेडर्लसने ऑकवूड हॉटेलमध्ये आणलं होतं.

Updated: May 24, 2012, 06:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईच्या जुहू रेव्ह पार्टीत ड्रग्स पुरवणारा ड्रग्स माफिया चार दिवसांनंतरही पोलिसांचा हाती लागलेला नाही आहे. रेव्ह पार्टीसाठी लाखो रुपयांचे ड्रग्स ह्या ड्रग्स पेडर्लसने ऑकवूड हॉटेलमध्ये आणलं होतं. तरूणांना ड्रग्सचा जाळ्यात अडकवणारा ड्रग्सचा सौदागर अजूनही गजाआड न झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे.

 

तारीख - ५ मार्च २००७

ठिकाण - पुणे ग्रामीण

रेव्ह पार्टीमध्ये बेधुंद तरुणांचा धुडगूस

चरस, कोकेन, ड्रग्स कॅप्सूल जप्त

ड्रग माफियाचा अजून शोध नाही

 

तारीख- ६ ऑक्टोबर २००८

ठिकाण- बॉम्बे ७२ डिग्री, जुहू

रेव्ह पार्टीत बेधुंद तरुणाईचा धिंगाणा

एक्सटसीच्या १०० टॅबलेटस, हिरोईन, एल.एस.डी, कोकेन जप्त

ड्रग माफिया  अजून बेपत्ता

 

तारीख- २६ जून २०११

ठिकाण- खालापूर

रेव्ह पार्टीत दंगा

गांजा, चरस, कोकेन जप्त

ड्रग माफिया अजून सापडला नाही

 

गेल्या काही महिन्यांत झालेल्या या रेव्ह पार्ट्या. रेव्ह पार्टीत छापा टाकून तरुणांना अटक होते आहे. आणि जामीनही मिळतो. पण या सगळ्या रेव्ह पार्टींना ड्रग्ज पुरवणारे ड्रग पेडलर कोण. याचं उत्तर पोलिसांना सापडलेलंल नाही.  हीच गत जुहूतल्या ओकवूड हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीची.  अजूनही पोलीस या ड्रग पेडलरचा शोध घेत आहेत. नशेचा हा सौदागर अजूनही मुंबईच्या रस्त्यांवर मोकळा फिरतो आहे. ओकवूड हॉटेलवर टाकण्यात आलेल्या छाप्यात पोलिसांना जमिनीवर कोकेन फेकलं असल्याचं आढळून आलं होतं.

 

छापा पडल्यावर मुलांच्या गर्दीतून हा तस्कर बाहेर पडला असावा, असा पोलिसांना संशय आहे. या ड्रग तस्कराला पकडण्यासाठी विश्वास नांगरे पाटलांनी चार अधिकाऱ्यांची टीम तयार केली. पण अजूनही या टीमच्या हाती काही लागलेलं नाही. विशेष म्हणजे याआधीच्या ड्रग पार्टींना इतके दिवस उलटूनही त्या पार्टीतले ड्रग पेडलरही अजून पोलिसांच्या जाळ्यात आलेले नाहीत.

 

 

 

 

 

Tags: