गृहनिर्माण विधेयक मंजूर... बिल्डरांना वेसण

बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विधानसभेत गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळं फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना वेसण घालायला मदत होणार आहे.

Updated: Jul 17, 2012, 10:52 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विधानसभेत गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळं फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना वेसण घालायला मदत होणार आहे.

 

फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांची बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याच्या प्रमाणात वाढ झालीय. फ्लॅटचं क्षेत्रफळ, फ्लॅटचं बांधकाम, विक्री, हस्तांतरण अशा अनेक टप्प्यांवर ग्राहकांची बिल्डरांकडून फसवणूक होत असते. याला आळा घालण्यासाठी गृहनिर्माण विधेयक मंजूर करण्यात आलंय. यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळून बिल्डरांना वेसण घालायला मदत होईल. तसंच गृहनिर्माण नियामक प्राधिकरणही स्थापन केलं जाणार आहे. त्यात बिल्डर्सना खरी माहिती देणं बंधनकारक करण्यात आलंय. प्राधिकरणाकडे नोंदणीही बंधनकारक करण्यात आलीय. फ्लॅटबाबतची सविस्तर माहिती प्राधिकरणाच्या वेबसाईटवर टाकावी लागणार आहे. माहिती लपवणाऱ्या बिल्डर्सवर एक ते दहा लाखांचा दंड आणि तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलीय.

 

या नवीन विधेयकामुळं बिल्डरांच्या मनमानीला आळा बसून सामान्य ग्राहकांची फसवणूक टाळण्यास नक्कीच मदत होणार आहे.

 

.