आबांची कबुली, राज्यात गुन्हे होत नाहीत सिध्द

राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून, हे चिंताजनक असल्याची कबुली खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदमध्ये दिली. २०११-१२ या वर्षी हे प्रमाण ८.२ टक्के एवढे कमी असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

Updated: Jul 16, 2012, 10:11 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून, हे चिंताजनक असल्याची कबुली खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदमध्ये दिली. २०११-१२ या वर्षी हे प्रमाण ८.२ टक्के एवढे कमी असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

दोषारोपपत्र दाखल करण्याची घाई, साक्षीदाराने साक्ष फिरवणे यासारख्या अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असल्या तरी पोलिस आणि सरकारी वकील यांच्यात समन्वय नसल्याचं कारण सर्वात महत्त्वाचं असल्याचं आर आर यांनी म्हटलंय.

या संदर्भात एक अभ्यास समिती नेमली होती, तिचा अहवाल प्राप्त झाला असून समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी ३ महिन्याच्या आत सुरु करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हा प्रश्न विधानपरिषदमध्ये उपस्थित केला होता.