आरक्षण : महिलांना 'पदां'चे राजकीय 'गाजर'

मुंबई महापालिकेत १२१ महिला निवडून आल्या आहेत. महिला नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असलं तरी शिवसेना-भाजप युतीनीच नाही तर कॉंग्रसे- राष्ट्रवादी पक्षानी महापौर, स्थायी समिती,सभागृह नेता अथवा विरोधी पक्ष नेत्याची उमेदवारी महिला नगरसेवकांना दिलेली नाही.

Updated: Mar 8, 2012, 04:16 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबई महापालिकेत १२१ महिला निवडून आल्या आहेत. महिला नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असलं तरी शिवसेना-भाजप युतीनीच नाही तर कॉंग्रसे- राष्ट्रवादी या राजकीय पक्षांनी महापौर, स्थायी समिती, सभागृह नेता अथवा विरोधी पक्ष नेत्यांची उमेदवारी महिला नगरसेवकांना दिलेली नाही. केवळ हे आरक्षण पदांमध्ये दिसत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

महिला आरक्षणामुळे मुंबई महापालिकेत ११४महिला निवडून आल्या आहेत.यात सर्व पक्षातील खुल्या वॉर्ड मधून ७ महिला निवडून आल्यान ही संख्या १२१ झालीए. त्यामुळे पालिकेतील शिवसेनेच्या - ४३, भाजपच्या -१६, कॉंग्रेसच्या - २८, राष्ट्रवादीच्या - ८,आणि मनसेचा - १४  असं महिलांचं संख्याबळ आहे. पालिकेत महिला राज निर्माण झालेलं असलं तरी महापौर, स्थायी समिती, सभागृह नेता तसंच विरोधी पक्ष नेत्याची उमेदवारीही महिला नगरसेवकांना दिलेली नाही. महिला नगरसेवकां वरील अन्यायाची नाराजी मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधवांनाही लपवता आलेली नाही.

 

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण घोषित झाल. तरी महिला नगरसेवकांना सत्तेतली महत्वाची पदं न दिल्यान सर्वच पक्षातील महिला नगरसेवक नाराज असल्याचं चित्र आहे. महिला नगरसेवकाची ही नाराजी दूर करण्यासाठी वैधानिक समित्या पक्षश्रेष्ठी देतील का हाच खरा सवाल आहे.