www.24taas.com, मुंबई
आदर्श घोटाळाप्रकरणी अध्यक्ष वांछू आणि प्रवर्तक आर. सी. ठाकूर यांच्यासह ४ जणांना सीबीआयने आज अटक केली आहे. तर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांना अटक वॉरंट बजावण्यात आला आहे.
आदर्श घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारलं होते. आरोपींना लवकरात लवकर अटक करा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. सबळ पुरावे असताना आरोपींना अटक का करत नाही, तुम्ही कोणाची वाट पाहत आहता? असा सवालच न्यायालयाने केला होता. त्यामुळे सीबीआयला ही कारवाई करण्यास भाग पडले आहे.
सीबीआयने बोगस नावाने सोसायटी प्लॅट घेतलेल्या आठ जणांची यादी न्यायालयाला सादर केली. या प्रकरणात सहभागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती सीबीआयने न्यायालयाला होती. दरम्यान कन्नैयालाल गिडवाणी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती.
मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोपातून मुक्तता करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि दोन वकीलांना सीबीआयने अटक केली होती. आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणात अडकलेले गिडवाणी या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आहेत. आदर्श सोसायटीच्या निर्मितीपासूनच गिडवाणी या सोसायटीचे प्रमुक सदस्य होते.