मुंबई: छेडछाडप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचा जबाब आज अखेर नोंदवला जाणार आहे. प्रीतीनं पोलिसांना 4 ते 6 वाजेची वेळ दिलेली असून बीसीसीआयच्या कार्यालय़ात जबाब नोंदवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पोलीस 30 मेच्या वानखेडेवर घडलेल्य़ा घटनेचं रिक्रिएनही करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
एक्स बॉयफ्रेंड नेस वाडियानं छेड काढल्याची तक्रार प्रीतीचा झिंटानं पोलिसांत नोंदवली होती. त्यानंतर ती परदेश दौऱ्यावर निघून गेल्यानं कारवाईत अडथळे निर्माण झाले होते. आता प्रीतीचा जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणातल्या कारवाईला गती येणार आहे. तसंच 30 मे रोजी नेमकं काय घडलं याचाही पर्दाफाश होणार आहे.
या प्रकरणात आतापर्यंत आयपीएलचे सीईओ सुंदर रमण यांच्यासह अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले होते. मात्र प्रीती परदेशात असल्यामुळं तिचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. त्यामुळं प्रीतीने जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होईल.
दरम्यान, नेस वाडियानं आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. माझ्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचं नेस वाडियाने म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.