मुंबईत आता पंधरा ठिकाणी 'नो सेल्फी झोन'

मुंबई : बांद्रा बँडस्टँडला सेल्फी काढताना झालेल्या अपघातानंतर दोन मुलींचा आणि त्यांना वाचवणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Updated: Jan 12, 2016, 09:44 PM IST
मुंबईत आता पंधरा ठिकाणी 'नो सेल्फी झोन' title=

मुंबई : बांद्रा बँडस्टँडला सेल्फी काढताना झालेल्या अपघातानंतर दोन मुलींचा आणि त्यांना वाचवणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आता पंधरा ठिकाणी 'नो सेल्फी झोन' घोषित केला आहे. 



बांद्र्याचा किल्ला, बांद्रा बँडस्टँड, मरीन ड्राईव्ह, वरळी किल्ला, शीव किल्ला, गिरगाव चौपाटी अशा काही ठिकाणांचा यात समावेश आहे. 





गतवर्षी नाशिक कुंभमेळ्यातही चेंगराचेंगरी टाळण्यासाठी अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. 



सेल्फी काढताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना जगभरात घडल्या आहेत. रशिया, स्पेन यांसारख्या देशांतही काही घटना घडल्यावर काही ठिकाणी 'नो सेल्फी झोन' घोषित केले गेले आहेत.