मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेमार्गावरील आसनगाव या स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीये. लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्य़ांवर याचा परिणाम झालाय.

Updated: Jan 29, 2016, 08:25 AM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील आसनगाव या स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीये. लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्य़ांवर याचा परिणाम झालाय.

बिघाडामुळे कल्याण-कसारा वाहतूक पूर्ण ठप्प झालीये. दोन्ही मार्गांवर लोकल, एक्सप्रेस खोळंबल्या आहेत. ऐन सकाळी गर्दीच्या वेळेस ही घटना घडल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झालाय. 

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनेत पुन्हा वाढ झालीये. यापूर्वी १९ जानेवारीला रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.