मुंबई : मध्य रेल्वेवर दाखल होणारी एसी लोकल आता प्रवाशांच्या सेवेत यायला आणखी वेळ लागणार आहे. पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेवर मे अखेरपर्यंत ही एसी लोकल येणार होती मात्र सॉफ्टवेअरचे काम अजूनही रखडले असल्याने मे महिन्यात एसी लोकलने प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न अधुरंच राहणार आहे.
मुंबई लोकल एसी करण्याची चर्चा गेली २ वर्षे सुरु होती. चेन्नईमध्ये रेल्वेच्या आयसीएफमध्ये बनलेली एसी लोकलची १६ एप्रिलला मध्य रेल्वेवर चाचणी झाली मात्र ती प्रत्यक्षात प्रवासांच्या सेवेला कधी येणार हे अद्याप समजलेले नाही. या लोकलच्या सॅाफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी असून त्यात बदल करण्यात येत असल्यामुळे विलंब होईल असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले.