राज ठाकरेंच्या सभेचं होणार तरी काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १३ तारखेला समारोपाची सभा कुठं घेणार याबाबत उत्सुकता आहे. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी नाकारल्यावर पक्षानं सुप्रीम कोर्टात जाण्याची चाचपणी केली. मात्र हे मैदान मिळण्याची शक्यता कमी असल्यानं इतर मैदानांचा शोध सुरु आहे.

Updated: Feb 7, 2012, 11:16 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १३ तारखेला समारोपाची सभा कुठं घेणार याबाबत उत्सुकता आहे. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी नाकारल्यावर पक्षानं सुप्रीम कोर्टात जाण्याची चाचपणी केली. मात्र हे मैदान मिळण्याची शक्यता कमी असल्यानं इतर मैदानांचा शोध सुरु आहे.

 

मनसेनं राम गणेश गडकरी चौकात सभेसाठी परवानगी मागितली होती. मात्र ट्रफिकच्या कारणाखाली ही परवानगी नाकारण्यात आली. तसंच आयोजक शिरीष सावंत यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. सभा घेतली तर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोर्तुगीज चर्च परिसरात परवानगी मागणारा अर्जही मनसेनं दिला आहे.

 

मात्र वाहतुकीच्या कारणावरून इथंही परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं आता वरळीतल्या जांबोरी मैदानाचा पर्याय आहे. हे मैदान PWD च्या अखत्यारीत येतं. मनसेनं त्यासाठी अनामत शुल्क भरलं आहे. मात्र अजुन परवानगी मिळालेली नाही. मात्र इथं परवानगी मिळण्याची शक्यता आहे.